Ticker

6/recent/ticker-posts

कोण जिंकणार खेळ पैठणीचा" या स्पर्धेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चितळे एक्सप्रेस सीवूड्स व लोकमत सखी मंच यांच्याच्या वतीने तसेच नेचर रिऍलिटी इंडिया, परंपरा फॅशन आयकॉन, श्री स्वामीनी सिल्क साडी, मा. नगरसेवक संदीप सुतार, मा. नगरसेविका सौ सलुजा सुतार यांच्या विशेष सहकार्याने कोण जिंकणार खेळ पैठणीचा हा महिलांच्या कलागुणांना वाव देणारी स्पर्धा नुकतीच नेरूळच्या डॉ.राजेंद्र प्रसाद सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. 

 रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडं मनोरंजनाकडे नेणारा हा महिलांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. प्रसिद्ध अभिनेते प्रणव रावराणे यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले व पैठणी जिंकण्या करीता विविध खेळत स्पर्धेत रंगत भरली. सोबतच नवी मुंबई भूषण व लावणी सम्राट अश्मिक कामठे यांनी या स्पर्धेच्या टॅलेंट राऊंडचे परिक्षण केले. 
महिलांनी कला सादर करीत स्पर्धा अधिकच बहारदार केली शेवटी पुष्पा पावले आणि आरती पानसरे यांनी स्पर्धा जिंकली दोघीना स्वामिनी सिल्क साडीच्या वतीने पैठणी व चितळे एक्सप्रेस सीवूड्स च्या वतीने बक्षिसे प्रदान करण्यात आली. नेचर रिऍलिटी इंडिया प्रा. ली. च्या वतीने सहभागी सर्व स्पर्धकांना बक्षिसे व लॅक्मे अकॅडमी खारघरच्या वतीने गिफ्ट व्हाउचर्स प्रदान करण्यात आली. 
 या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धेला प्रोत्साहन दिले. यावेळी नेचर रिऍलिटी इंडिया प्रा. ली. चे संचालक दत्तात्रय चौगले व बी. जी. पाटील, चितळे एक्सप्रेस सिवूड्स चे सागर कळाणे, स्वामिनी सिल्क साडीचे प्रकाश मर्ढेकर, माजी नगरसेवक संदीप सुतार, डायडम मिस इंडिया ची उपविजेती सायली सावंत, आहारतज्ञ सायली भोसले, मित कौर यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments