| भारतीय रेल्वेमध्ये महाभरती | 2400 जागांवर नोकरीची संधी | Indian Railway Recruitment 2022

नवी दिल्ली : (Railway Recruitment 2022)नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेकडून सर्वात मोठी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेकडून तब्बल 2422 पदांवर अप्रेंटिस भरती करण्यात येणार आहे. Railway Posts: मध्य रेल्वे विभागात फिटरवेल्डरटर्नरकारपेंटरपेंटरटेलरमॅकेनिकइलेक्ट्रिशियनइलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिकप्रोग्रामिंग अँड सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट सोबतच इतरही ट्रेड्ससाठी नोकरीची संधी असेल.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार सर्व पदांसाठीच्या अप्रेंटिस शिपसाठीचा कालावधी हा एक वर्षाचा असेल. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे. या भर्ती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची चाचणी परीक्षा होणार नसून थेट निवड केली जाणार आहे. Education Qualification post for Indian Railway :यासाठी 10 वी आणि आय़टीआयमध्ये मिळालेल्या गुणांना अनुसरून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार www.rrccr.com या संकेतस्थळावरुन नोकरीसाठीचा अर्ज करु शकतात.
पात्रता अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून दहावी परीक्षेत किमान 50 टक्के गुण असावेत.सोबत ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे NCVT अथवा SCVT मान्यताप्राप्त असेल ते असावं. वयोमर्यादा अप्रेंटिसशिपसाठी किमान वयोमर्यादा 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे इतकी आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अर्ज कसा करावा ? How to online apply Indian Railway Post Application सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे असणाऱ्या रिक्र्यूटमेंट लिंकवर क्लिक करा. फॉर्म आणि फी भरा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत स्वत:कडे बाळगा.अर्जदारांची निवड मुंबई, क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपुर आणि सोलापुरमधील विविध युनिट्सवर केली जाईल.
0 Comments